Weather update : आज रात्री महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा; पुढील 24 तास महत्त्वाचे, हवामाशास्त्र खात्याचा अंदाज

 

Weather update : महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा; पुढील 24 तास महत्त्वाचे, IMD कडून हवामानाबाबत मोठी बातमी

महाराष्ट्रात आज पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

, हवामान विभागाकडून (IMD) महाराष्ट्रात आज पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे.

महत्वाची माहिती पहा क्लिक करून.

 

हवामान विभागाकडून उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसामुळे पेरणीपूर्व मशागतीला वेग येणार आहे.

दरम्यान दुसरीकडे मराठवाड्यात देखील आज हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 

 

नुसता पाऊसच पडणार नसून, वादळी वाऱ्याचा इशारा देखील हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. या काळात महाराष्ट्रात ताशी 40 ते 50 किमी वेगानं वारे वाहन्याची शक्यता आहे.

महत्वाची माहिती पहा क्लिक करून.

मुंबईबाबत बोलायचे झाल्यास पुढील 24 तास मुंबई आणि उपनगरात ढगाळ हवामान राहणार असून, सायंकाळच्या सुमारास हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. मुंबईचं कमाल तापमान 36 अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकतं.

 

राज्याच्या काही भागात अजूनही उष्णतेची लाट आहे. मात्र पुढील दोन ते तीन दिवसांत पाऊस सर्वदूर हजेरी लावण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

पाऊस पडल्यामुळे अनेक भागात पेरणीपूर्व मशागतीला वेग आल्याचं चित्र आहे, शेतीच्या कामाला सुरुवात झाली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत आणखी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

 

Leave a Comment